जाऊन तिच्या फोटो वर एक comment छान सी करावीशी वाटते ...
हळूच माझ्या मनातली दडलेली गोष्ट तिला सांगावीशी वाटते ...
पण.. Mouse क्लिक होत नाही कि keyboard type करत नाही ...
काहीच केल्या मनातली गोष्ट काही unlock होत नाही ...
रोज तिच्या आठवणींनी ... मन तळमळून उठत असते ...
तिला पहिले नाही की ... सैर वैर पळू लागते ...
एरव्ही मी .. सूर्याच्या गर्मीत कसा बसा दिवस काढतो ...
शीतल चांदण्यात.. केवळ तिच्याच विचारात डुबून जातो ...
प्रेमाची एक वाट तिच्याच दारात दिसते ती खरी ...
तीच माझ्ही अप्सरा आणि तीच माझ्ही प्रेमातली परी ...
पण परी ठरली आकाशातली आणि मी राहिलो खालचा ...
तिच्या होकाराची वाट पाहूनच जीव जाईल आमचा ...
हांक दिली तरी परी पाहूनही पाहत नाही ...
कसे काय होणार या प्रेमाचे काहीच कसे कळत नाही ...
म्हणून म्हणतात लोक कि पऱ्यांची स्वप्न हि फक्त ऐकायला चांगली असतात ..
स्वप्न शेवटी स्वप्नच मुळी... पऱ्या ह्या कधी हि प्रेमा योग्य नसतात ..
जीवावर दगड ठेवून मी हि reality विसरून पाहील
पण रोज रात्री परीला स्वप्नात तरी नक्की भेटत जाईल
रोज रात्री परीला स्वप्नात तरी नक्की भेटत जाईल ... नक्की भेटत जाईल
- रुपेश
Awesome... Mitra...!!! Awadli Apalyala...!!!
ReplyDeleteThanks a lot KK :-)
ReplyDelete